menu

श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग

श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग हे भारतातील एक पवित्र ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र मानले जाते महाराष्ट्रात बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ हे तालुक्याचे शहर आहे . परभणी हैद्राबाद रेल्वे मार्गावरील हे एक महत्वाचे जंक्शन आहे . कन्याकुमारी ते उज्जैन या भूमध्यरेषेवर मेरूपर्वत किंवा नागनारायण डोंगराच्या एका टेकडीच्या उतारावर हे क्षेत्र विराजमान आहे . ब्रम्हा, वेणू व सरस्वती या नद्यांचे सान्निध्य यास लाभले आहे . या गावास वैजयंती व जयंतीक्षेत्र या नावांनी पण ओळखले जाते . हे हरिहार मिलनाचे स्थान आहे. त्यामुळे शिव महोत्सवा सोबत कृष्ण महोत्सव ही साजरा केला जातो .बिल्वपत्रासोबत वैकुंठ चतुर्दशीला तुळस ही वाहिली जाते.या माहिती वरून हे स्थान भौगोलिक दृष्ट्या महत्वपूर्ण आहे. मेरूपर्वत या नावाने पर्वत स्थानी हे क्षेत्र वसलेले आहे . संपूर्ण मराठवाड्यात बालाघाट पर्वत पसरलेला आहे. या पर्वताच्या पायथ्याशी श्री क्षेत्र परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग वसलेले आहे.

बीड जिल्हयासाटी प्राचीन असा वारसा लाभला आहे . श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग येथे येण्यासाठी विविध साधने उपलब्ध आहेत , रेल्वे , राज्य परिवहन बसेस , ईत्यादी . औरंगबाद हे सर्वात जवळचे विमानतळ आहे . औरंगबाद येथून खाजगी वाहनाने श्री क्षेत्र ज्योतिर्लिंग परळीला येता येते .औरंगबाद ते परळी ज्योतिर्लिंग अंतर अंदाजे 230 किमी आहे , तसेच पुणे व मुंबई हून रोज रात्री खाजगी ट्रॅवल्स उपलब्ध आहेत. मोठे औष्णिक विज निर्मिती केंद्र व सीमेट कारखाना ही श्री क्षेत्र परळी ज्योतिर्लिंगची वैशिष्ठे आहेत.

देशभरातून लाखो भाविक श्री वैजनाथ ज्योतिर्लिंगचा दर्शनास येतात . त्यांच्या दर्शनाची चोख व्यवस्था मंदिर विश्वस्थाकडून केली जाते तात्काळ दर्शनासाठी स्पेशल दर्शन पास महा शिवरात्रिस व श्रावण सोमवारी उपलब्ध असतात. राहण्यासाठी येथे उत्तम व्यवस्था देवस्थान भक्त निवासात आहे.सुरक्षेसाठी शंभर पेक्षा जास्त सिसिटीव्ही कॅमेरा व सेक्युरिटी गार्ड यांची करडी नजर मंदिरावर असते. पिण्यासाठी शुध्द आरो पाणी याची चोख व्यवस्था मंदिर व्यवस्थापनाकडून केली आहे . रोज खिचडी प्रसाद व दोनवेळा भोजन प्रसाद श्री सदाशिवसेवा अन्नछत्र मार्फत केली आहे. यात्रेकरूंचे सामान ठेवण्यासाठी लॉकर रूम ची सुविधा उपलब्ध आहे .वाहन पार्किंग साठी मोठे वाहन तळ उपलब्ध आहे .