menu

History

श्री क्षेत्र परळी येथील ज्योतिर्लिंग शिवमंदिर हेमाडपंथी शैलीचे आहे. येथील शिवमदिराची रचना गर्भग्रह, अंतराळ व सभामडप अशी आहे हेमाद्रि पंडित हा मदिरच्या विशिष्ट प्रकारच्या घाट बांधकामासाठी प्रसिद्ध आहे. बांधकाम करताना चुन्याचा किंवा ईतर वस्तूंचा वापर न करता दगडावर दगड ठेवून किंवा दगडांना खाचा करून देवळाचे बांधकाम केले जात असे. मदिरच्या शिखराची घडण हे याचे मुख्य वैशिष्ठ्य होय.या मदिरच्या दगडी शिखरावर विविध मूर्ति आहेत. त्यात राजे मल्हारराव होळकरांचा अश्वारूढ पुतळा आहे. मुख्य मदिराचा पूर्वेकडील दरवाजा महाद्वार म्हणून ओळखला जातो. यावरील दगडी कोरीव काम, शिल्प आणि या दरवाजाचे भक्कम बांधकाम हे लक्ष वेधून घेणारे आहे. चैत्री पोर्णिमा व आश्विन पोर्णिमा या दिवशी सूर्याची पहिली पाच किरणे याच प्रवेश द्वारातून श्री प्रभू वैजनाथाच्या पिंडीवर पडतात असा उल्लेख धार्मिक ग्रंथात सापडतो.अलीकडे होत असलेल्या भौगोलिक बादलामुळे कांही वेळा अशी किरणे पडलेली दिसत नाहीत या महाद्वारावर त्रिकाल चौघड्याची हजेरी असते. या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर विस्तीर्ण, उंच व प्रशस्त असा सागवानी लाकडाचा बिनखांबी सभामंडप आहे. मुख्य सभामंडपातून आत प्रवेश करताना चांदीचा दरवाजा लागतो. त्याच्या बाजूला भिंतीवर अहिल्याबाई होळकर यांचा शिलालेख आहे. याच ठिकाणी खाली जमिनीवर मोठे कासवही आहे. या दरवाजातून आत आल्यावर विशाल गर्भगृह नजरेस पडते. तेथे श्रीगणेश व माता पार्वतीचे दर्शन होते. मुख्य गाभार्‍या समोर एका बाजूला श्रीगणेश व दुसर्‍या बाजूला विविध देवीच्या मूर्ति आहेत. महादेवाच्या बर्‍याच मंदिरात गाभारा सभा मंडपापेक्षा कांहीसा खोल असतो मात्र येथे देवाचा गाभारा व सभा मंडप हे एकाच पातळीत आहेत.

शके 1706 मध्ये चैत्र शुक्ल पंचमी शुक्रवारी अहिल्यादेवी होळकर यांनी हे मदिर बांधून ( जिर्णोधार करून) पूर्ण केले , असा कालनिर्देश पूर्वेकडील दरवाजाजवळ एका संस्कृत शिलालेखात आहे. गाभार्‍यातून या शिवलिंगचे दर्शन घडते , म्हणजेच बारा ज्योतिर्लिंगा पैकी एक अशी रचना असलेले हे एकमेव मंदिर होय . गाभार्‍यात जाऊन श्री वैजनाथचे दर्शन घेताना तेथील पवित्र वातावरणाने आणि या स्थान महात्मने मन भारावून जाते . श्री वैजनाथ शिवलिंग हे शालिग्राम शिळेचे असून ते भव्य , तेजस्वी व प्रसन्न दिसते. येथे शिवशक्तीसह वास करीत आहेत ,मदिर व्यवस्थापनेसाठी पेशव्यांनी स्थांनिकांना अनेक बिघे जमीन ईनाम दिली होती असा ऐतिहासिक उल्लेख कागद पत्रात आढळतो . सोमवार हा भगवान शंकरच्या उपसनेचा महत्वाचा वार असल्यामुळे या दिवशी नेहमीपेक्षा अधिक वर्दळ असते. हे एक प्रमुख ज्योतिर्लिंग असल्याने महाशिवरात्रीचा उत्सव येथे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो . या दिवशी देशभरातून लाखो भाविक श्री वैजनाथ ज्योतिर्लिंगचा दर्शनास येतात . त्यांच्या दर्शनाची चोख व्यवस्था मंदिर विश्वस्थाकडून केली जाते .तत्काळ दर्शनासाठी स्पेशल दर्शन पास ही उपलब्ध असतात राहण्यासाठी येथे उत्तम व्यवस्था देवस्थान भक्त निवासात आहे.